Skip to main content

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

  



पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते.

उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलनियोजन पासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासून बाजारसाखळी तयार करण्यापर्यंत पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन अशा सर्व बाबी गावात पूर्ण करून गावातला छोट्यातला छोट्या शेतकऱ्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ होईल असा प्रयत्न करण्यात आला आहे. नुकतेच पिक विमा योजना सुधारित केली आहे.

श्री.फडणवीस पुढे म्हणाले, शेतीच्या क्षेत्रात यावर्षीपासून येत्या ५ वर्षात दरवर्षी ५ हजार अशी २५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठिबक संच, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, पंप आदी देण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. गतकाळात निर्णय घेतल्याप्रमाणे साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषीपंपांचे वीजबिल आकारले जात नाही.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी, शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि योजनांची लहान व मोठ्यातल्या मोठ्या शेतकरी अशा सर्वांना त्यांचा लाभ घेण्याची माहिती मिळावी यासाठी कृषी प्रदर्शन भरवावे अशी अपेक्षा सुधाकरपंत परिचारक यांनी २०१५ साली व्यक्त केली होती. तेव्हापासून दरवर्षी हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यामध्ये शासनाचे विविध विभाग, कृषी विद्यापीठे यांचे स्टॉल, विविध योजना, वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'एआय'चा वापर, उत्पादकता वाढविण्यासाठीच्या वेगवेगळी पद्धतींचेही प्रदर्शन या ठिकाणी पहायला मिळत आहे. सेंद्रिय खते, नैसर्गिक खते, वेगवेगळ्या खतांचे मिश्रणे, माती परीक्षण ते कापणीपर्यंतच्या वेगळगवेगळ्या तंत्रज्ञानाची झलक येथे पाहायला मिळते, तरी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पणनच्या योजनांचा लाभ बाजार समित्यांच्या माध्यमातून मिळत आहे. गावातील विकास सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय संस्थात रूपांतरण करण्याचा केंद्र शासनाच्या प्रयत्न असून १८ प्रकारचे व्यवसाय या संस्थाना करता येणार आहेत. बाजार आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा ठरण्याचे काम या संस्था करतील. स्टोरेज, कोल्ड स्टोरेज आदी व्यवस्था करून शेतकऱ्यांच्या माल योग्य भावात मोठ्या प्रमाणात माल विकला जाईल असा प्रयत्न असल्याचेही श्री. फडणवीस म्हणाले.

 पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यंत प्रगतिशील असून अत्यंत चांगले काम करते. समितीने पणन विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

ॲड. कोकाटे म्हणाले, वारकरी आणि शेतकरी हे वारीच्या दोन बाजू आहेत. शेतीत येणाऱ्या तंत्रज्ञानाची वारीत सहभागी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी चांगले प्रदर्शन भरविण्यात आले आहे.  शेती चांगली आणि सुरळीत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. या प्रदर्शनात सुमारे २५० स्टॉलच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, पीएमएफएमई योजना, आत्मा, स्मार्ट प्रकल्प आदींची माहिती व प्रदर्शन केले आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

 

Comments

Popular posts from this blog

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ –केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. - खासदार प्रणिती शिंदे

     नवी दिल्ली - वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केंद सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यास सरकारचा विरोध आहे का ?  असा सवाल करत कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून कोणकोणत्या उपयोजना राबवण्यात येत आहेत याबाबत विचारणा केली. यावर सरकारने यंत्रमाग कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली.        संसेदेच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी व तारांकित प्रश्न उत्तरांच्या तासादरम्यान सोलापूरसह देशभरातील यंत्रमाग कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यंत्रमाग कामगार वर्ग हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण  करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अशा यंत्रमाग कामगारांच्या मुलांच्या शिक्ष...

मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त शासन संवाद द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया चे संपादक मालक प्रकाशक मुद्रक आणि स्वयंसेवी संस्था चे दाजी प्रतिष्ठान सोलापूर चे अध्यक्ष विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार आणि संस्कृती पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...

   अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे - मला माझा प्राण आणि शरीर त्याग करावयाचा आहे या करिता मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात किवा दादरच्या चैत्य भूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या आवारात विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला  विधिवत  हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार  पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...   प्रती मा राष्ट्रपती राष्ट्रपती भवन भारत सरकार दिल्ली दिनांक १५  जुन २०२५   टीप – सोबत श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे यांचे त्यांच्या आईच्या नावे असलेले राहते घराची छायाचित आणि ओळख पत्राची छायाचित्र परत जोडली आहे   विषय – केवळ आम्ही हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्तील महार जातीचे असलेने आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून पाकिस्तानातून शोर्ट कालावधी करिता आलेले पाकिस्तानी आतंकवादी शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि मला नोकरी करू दिली जात नाही त्यामुळे माझे शिक्षण एमएससी प्राणीशास्त्र एमएड शैक्षणिक तंत्रविज्ञान एमए  जनसं...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

    भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे -  प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते ,  त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की ,  भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत ,  आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत ,  पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर ,  सरपंच संतोष देशमुख हत्या ,  महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आह...